अहिल्यानगर महापालिकेत सहा स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार…..असे आहेत पात्रतेचे निकष…

कोण होऊ शकतो महापालिकेत नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत सदस्य)…
अहिल्यानगर : महापालिकेत महापौर-उपमहापौर पदांची निवड झाल्यानंतर आता नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत सदस्य) नियुक्तीचे वेध लागले आहेत. अहिल्यानगर महापालिकेत सहा स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. राजकीय पक्षांच्या बलाबलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ३, भारतीय जनता पक्षाचे २ शिवसेनेचा १ सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून निवडला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
केवळ राजकीय सोय लावण्यासाठी या नियुक्त्या होऊ नयेत, यासाठी राज्य सरकारने यासाठीचे निकष कड़क केले आहेत. पात्रता पूर्ण करणाऱ्यांच्या नावांची संबंधित पक्षाच्या गटनेत्यांना आयुक्तांकडे शिफारस करावी लागणार आहे.
असे आहेत पात्रतेचे निकष…
-राज्यात नोंदणीकृत असलेला डॉक्टर
-मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता किंवा मुख्याध्यापक.
-सनदी लेखापाल (सीए), पदवीधारक अभियंता, वकील.
-महानगरपालिका किंवा नगरपरिषदेत मुख्य अधिकारी, सहायक आयुक्त किंवा उपायुक्त म्हणून काम केलेला निवृत्त अधिकारी
-नोंदणीकृत सामाजिक संस्थेचा पदाधिकारी
घटकांपैकी एका घटकात किमान पाच वर्षांच्या कामाचा अनुभव असलेला व्यक्ती पात्र ठरणार आहेत. आलेल्य़ा शिफारशींची आयुक्तांकडून छाननी होईल. महापौरांच्या उपस्थितीत होणाऱ्या पहिल्या सभेत या स्वीकृत सदस्यांची घोषणा केली जाईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles