विद्युत ठेकेदाराकडून बिलाच्या मोबदल्यात लाच मागून तडजोडीअंती आठ लाख रुपये स्वीकारणे उपअभियंत्याला खूप महागात पडलं. नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत उपविभागाचा उपअभियंता नितीन इंगळे याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सोमवारी सायंकाळी करण्यात आली.
तक्रारदार हा शासकीय नोंदणीकृत विद्युत ठेकेदार असून त्याने शासनाच्या विविध विद्युत कामांचे ठेके घेतले होते. संबंधित प्रकरणात बिल अदा करण्याच्या बदल्यात लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.


