पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच, रिल्स स्टार निर्मला नवले हरल्या की जिंकल्या ?

सोशल मीडियावर हजारो फॉलोअर असलेले म्हणजे राजकारणात यश मिळते असे नाही. कारण रिल्सच्या माध्यमातून चर्चेत असलेल्या निर्मला नवले यांचा शिरुर येथील कारेगाव गणातून पराभव झाला आहे. राष्ट्रवादी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिले होते. मात्र, भाजपाच्या मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा २७०० मतांनी पराभव केला आहे.

कारेगावच्या माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले या सोशल मीडियावर रिल्सस्टार झाल्या होत्या. त्यांना प्रचंड फॉलोअर देखील होते. त्यांचा एक रेंज रोव्हर घेतल्यानंतरचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. रेंज रोव्हर कार घेण्याचे माझं स्वप्न होते. मला जी गोष्ट पाहीजे असते ती मला मिळतेच. आणि शुभम मला ती वस्तू मिळवूनच देत असतो. मला जे हवे ते देण्याची सवयच आपण नवरा शुभम याला लावली असल्याचे विधान करुन निर्मला नवले प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. नवऱ्या गिफ्ट दिलेली रेंज रोव्हर कार पाहून लहान मुलांसारख्या उड्या मारतानाचा त्यांचा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता. या व्हिडीओला बरेच ट्रोल देखील करण्यात आले होते. सरपंच झाल्यानंतर रेंज रोव्हर घेता येते हे माहिती नव्हते अशा प्रतिक्रीया देखील या व्हिडीओला आल्या होत्या.राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समितीसाठीच्या निवडणुका झाल्या. त्याचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये शिरूर पंचायत समितीचाही समावेश आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कारेगाव गणातून निर्मला नवले यांना उमेदवारी दिली होती. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी या निवडणूकीत निर्मला नवले यांचा पराभव केला आहे. मनीषा यांनी निर्मला नवले यांचा 2700 मतांनी पराभव केला आहे.


निर्मला नवले या माजी सरपंच असून त्यांचे सोशल मीडियावर 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. नेहमी वेगवेगळे व्हिडीओ त्या पोस्ट करत असतात. त्यांचा रेज रोव्हर गिफ्ट मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. आयटी इंजीनिअर असलेल्या निर्मला या सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर उच्चशिक्षित सरपंच असे त्यांचे कौतुक केले जात होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles