तरुणीचा विनयभंग करून लग्नासाठी मारहाण ; अहिल्यानगर शहरातील घटना

अहिल्यानगर-शहरातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नास नकार देऊन भ्रमणध्वनी क्रमांक काळया यादीत टाकल्याच्या रागातून एका तरुणाने हे कृत्य केले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि जामगाव येथील प्रशांत जगन्नाथ बरवे यांची पाच वर्षांपासून ओळख होती. मात्र, काही काळापासून तरुणाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. याचाच राग मनात धरून रविवारी दुपारी तरुणी कामावरून घरी जात असताना आरोपीने तिचा रस्ता अडवला. “तू माझ्याशी का बोलत नाहीस, माझा क्रमांक का बंद केलास?” अशी विचारणा करत त्याने तरुणीचा हात पकडून विनयभंग केला.

​यावेळी तरुणीने विरोध केला असता आरोपीने तिला हाताने मारहाण केली. पीडिता तेथून घरी निघाली असता आरोपीने तिचा पाठलाग केला. “जर तू माझ्याशी लग्न केले नाहीस, तर मी आत्महत्या करीन,” अशी धमकीही त्याने दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तातडीने घरच्यांना माहिती देऊन पोलिसांत धाव घेतली. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी प्रशांत बरवे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास महिला पोलीस अंमलदार करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles