Thursday, February 19, 2026

Gold Silver Price: सोने, चांदीच्या दरात ‘हा’ मोठा बदल… जाणून घ्या आजचा १० ग्रॅमचा भाव

सोने आणि चांदीच्या दरातील दोन दिवसांच्या तेजीनंतर सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. गुंतवणूकदारांनी नफा वसुलीचं धोरण स्वीकारल्यानं मंगळवारी सकाळी वायदेबाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एप्रिलच्या वायद्याचे सोन्याचे एका तोळ्याचे दर 1.6 टक्क्यांनी म्हणजेच 2500 रुपयांनी घसरुन 155546 रुपयांवर आले आहेत. तर, चांदीच्या वायद्याचे दर 4 टक्क्यांनी घसले. चांदीच्या दरात 11000 रुपयांनी म्हणजेच 251544 रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये 1.4 टक्क्यांनी घसरले आहेत. सोन्याचे दर 5000 डॉलर प्रति औंसच्या खाली आले आहेत. 29 जानेवारीला सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत सोन्याचे दर 10 टक्क्यांनी घसरले आहेत. सिंगापूरमध्ये 8.00 वाजता स्पॉट गोल्ड 0.5 टक्क्यांनी घसरुन 5032.53 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. चांदीचे दर 1.8 टक्के म्हणजे 81.92 डॉलरनं घसरले आहेत.

अमेरिकन डॉलर निर्देशांक 96.82 वरुन वाढून 97.01 वर पोहोचला आहे. विदेशी खरेदीदारांसाठी डॉलर आधारित सोनं महागलं आहे. अमेरिकन रोजगार आणि महागाई संदर्भातील आकडेवारी येण्यापूर्वी गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत.

जानेवारी महिन्याच्या शेवटी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती. भूराजनैतिक संघर्ष, केंद्रीय बँकांची सोन्याची खरेदी यामुळं सोन्याच्या दरातील वाढ पाहायला मिळाली होती. सराफा बाजारात सोन्याचे 9 फेब्रुवारीचे दर पाहिले असता 24 कॅरेट सोन्याचा दर 154880 रुपये होता. तर, 22 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 151160 रुपये आहेत. 20 कॅरेट सोन्याचे दर 137840 रुपये आहेत. 18 कॅरेट सोन्याचा दर 125450 रुपये तोळा आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर 99900 रुपये तोळा असा आहे.

सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानं गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला आहे. चांदीच्या दरानं 4 लाख 20 हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत सध्या चांदीचे दर 1 लाख 70 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. सोन्याच्या दरात देखील वाढ पाहायला मिळाली होती. मात्र, सध्या सोने आणि चांदीच्या दरात थोडी घसरण झाल्यानं दागिने खरेदीकरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles