Thursday, February 19, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं ?

प्रकृती बिघडल्यामुळे सध्या पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांना फोन केला होता. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही आज शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. शरद पवार यांना सोमवारी प्रकृतीचा त्रास जाणवत असल्यामुळे बारामतीवरुन पुण्यात आणण्यात आले होते. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्या झाल्या होत्या. मात्र, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही, असा निर्वाळा डॉक्टरांनी दिला होता. शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये गेल्या काही तासांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याने त्यांना आज संध्याकाळी किंवा उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.

शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुबी रुग्णालयातील डॉक्टर सायमन ग्रँट यांनी दिली. शरद पवारांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहेत. काल त्यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यांना होत असलेला त्रास काही प्रमाणात कमी झाला आहे. शरद पवारांना खोकल्याचा त्रास झाला होता. सध्या अँटिबायोटिक्स औषधे सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलनुसार शरद पवारांवर उपचार सुरू आहे आणि बारकाईने लक्षात ठेवण्यात येत आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी हॉस्पिटलच्या आवारात गर्दी करू नये असा आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles