राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांना मरणोत्तर ‘पद्मविभुषण’ हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला शिफारस करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगाव चे आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले.
महाराष्ट्राच्या राजकारणात 40 पेक्षा जास्त वर्ष सक्रिय असणाऱ्या अजितदादा पवार यांचे राजकीय, सामाजिक, शेती, सहकार, शिक्षण आदी विभागांसह महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान असुन देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी असलेला ‘पद्मविभुषण’ हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करण्यात यावा अशी राज्याच्या जनतेचीही भावना आहे. त्यासाठी राज्य सरकारने केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे.


