Friday, February 20, 2026

काही नेत्यांची इच्छा नसली तरी…. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेताच रोहित पवार यांची पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. अजितदादांच्या निधनानंतर तीन दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. सुनेत्रा पवार यांनी आधी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर आणि चैत्यभूमीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला.

उपमुख्यमंत्री पवार यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली. “ज्या खुर्चीत बसून अजितदादा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचे, त्याच खुर्चीत आज मा. सुनेत्राकाकींना पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुखः अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय. या खुर्चीत आज अजितदादा नाहीत याचं अतीव दुःख आहे पण सुनेत्राकाकी आहेत याचा आनंदही आहे” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

अजितदादांची उणीव कदापि भरुन काढता येणार नाही पण सुनेत्राकाकी या अजितदादांच्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करताना राज्यभरातील सामान्य माणूस आणि त्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम करतील, याचा पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा! तसंच उपमुख्यमंत्री पदासह त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकरच विराजमान व्हावं, ही काही नेत्यांची इच्छा नसली तरी राज्यभरातील लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, त्यामुळं तीही त्या पूर्ण करतील, असा विश्वास आहे” असं रोहित पवार म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles