Friday, February 20, 2026

अजितदादांच्या विमान अपघाताविषयी रोहित पवारांचे धक्कादायक खुलासे! स्वेटर जळालेला, पायात चप्पल, हातात बंद घड्याळ

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये शंकेचं काहूर माजलं आहे. अजित पवारांचा घातपात झाल्याचाही संशय राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची कठोर चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. अजितदादांच्या विमान अपघातावर आमदार रोहित पवार यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.
अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या विमान अपघातानंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. विमानात पाच नव्हे तर सहा जण होते. सहावी व्यक्ती ही अजित पवार आहेत. अजित पवार अजूनही हयात आहेत, अशा अनेक चर्चा केल्या जात होत्या. या सर्व चर्चा लक्षात घेता पवार कुटुंबातील सदस्य आमदार रोहित पवार यांनी मी येत्या 10 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन सर्व खुलासे करेन असे सांगितले होते. दरम्यान, आज (10 फेब्रुवारी) रोहित पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित करत अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. अजिदादा आज हयात नाहीत. त्यांचा विमान अपघातच झाला होता, असे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच अजितदादा आज हयात नाहीत हे सांगताना त्यांनी अजितदादांच्या घडीचा दाखला दिला. अजितदादा यांच्या हातात असणारी घडी पाहून त्यांचा खरंच अपघात झाला, हे मला समजले, असे रोहित पवार यांनी सांगितले. अजितदादा यांचा विमान अपघात झाल्यातंतर रोज सहा दिवस मला वाटत होतं की मी एक घाणेरडं स्वप्न पडलं आहे. दादांचा अपघात झालाच नाही असं मला वाटतं होतं. परंतु जेव्हा दादांचा एक जळलेला स्वेटर, त्यांची चप्पल आणि दादांचे घड्याळ मी पाहिले. दादा दररोज घड्याळ घालायचे. ते घड्याळ 15 मिनिटे नेहमी पुढे असायचे. त्या घड्यााळात 9 वाजले होते. ते घड्याळ बंद पडलेले होते. ते पाहून मला समजलं की अजितदादा हयात नाहीत, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले
सर्व माहिती घेऊन मी तुम्हाला काही माहिती सांगतो. काही लोक म्हणतील ही माहिती कुठून आणली, कशी आणली. अजितदादांच्या प्रेमापोटी आम्ही ही माहिती गोळा केली आहे. आम्ही सरकारमध्ये नाही. तरीही जे जमलं ते केलं. दादा आणि साहेबांनी एकच सांगितलं प्रयत्न करत राहा. त्यामुळेच हा प्रयत्न केला आहे. लोकांना काय घडलं ते कळलं पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार

९ तारखेला अजितदादांबद्दल काही सांगणार होता अपघाताबद्दल…त्याचं काय झालं…

१० तारखेला याबाबतीत मला काय वाटतं ते सांगणार आहे असं म्हणालो.

काही लोकांनी भावनिक होऊन काही व्हिडिओ टाकलेत.

ते व्हिडिओ दादा परत येतील. सहा जण विमानात होतं. सहावी व्यक्ती दादा होते. ती बॉडी दादांची नव्हतीच. दादा आज येतील, उद्या येतील.. दादा परत आले तर मी त्यांना घट्ट मिठी मारील.

दादांचा अपघात झाला, ते स्वप्न होतं. मला असं वाटत होतं. कधीपर्यंत…जेव्हा दादांचा एक स्वेटर जळलेला, चप्पल, घड्याळ …दादा कधीही त्यांचा वेळ असतो. १५ मिनिटे पुढे ठेवायचं. ते बंद घड्याळ मी बघितलं. ज्यांनी बघितलं ते निशब्द झाले होते.

जी घटना झाली नाही, असं ज्यांना वाटतं…पण ही घटना झाली आहे. आज दादा नसले तरी, तरी विचाराने ते आपल्यासोबत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles