Thursday, February 19, 2026

आता विषय संपलेला नाहीये…विषय सुरू झालाय.. Big Bossने निष्कासित केल्यावर दिव्या शिंदे!

बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमधून गेल्या आठवड्यात दिव्या शिंदेला निष्कासित करण्यात आलं. घरातील अन्य सदस्यांना टास्कदरम्यान जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आणि त्यानंतरही माफी मागण्यास नकार दिल्याने दिव्या शोमधून निष्कासित करण्यात येत आहे असं ‘बिग बॉस’ने जाहीर केलं.

तिला घरातून निष्कासित केल्यावर याबद्दल सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दिव्या घराबाहेर आल्यावर दुसऱ्याच दिवशी तिच्या टीमकडून एक निवेदन जारी करण्यात आलं होतं. यामध्ये दिव्याच्या टीमने तिच्या तमाम चाहत्यांचे आभार मानत, “कृपया कोणीही या घटनेबाबत चुकीची, अर्धवट माहिती किंवा नकारात्मकता पसरवू नका. लवकरच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील” अशी विनंती सर्वांना केली होती. आता यानंतर दिव्या स्वत: कॅमेऱ्यासमोर आली आहे.

‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर आल्यावर दिव्याने पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. दिव्या म्हणते, “संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून आणि परदेशातून तुम्ही मला जे आशीर्वाद दिलात. माझ्यावर प्रेम केलंत, सपोर्ट दिलात यासाठी मी नेहमीच ऋणी राहीन. मी लवकरच तुमच्यासमोर येईन. आता विषय संपलेला नाहीये…विषय सुरू झालाय.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles