तरूणाला मारहाण …. नगर शहरात भाजपा नगरसेवकासह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर-एका तरूणाला नगरसेवकासह पाच जणांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करून लोखंडी रॉडने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी मध्यरात्री अहिल्यानगर-पुणे रोडवरील राजश्री हॉटेलसमोर घडल्याचा आरोप आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या रोहित सुरेश पाथरकर (वय 26, रा. केडगाव) याच्यावर खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी पाथरकर यांनी रूग्णालयात उपचार घेत असताना 15 सप्टेंबर रोजी पोलिसांना जबाब दिला आहे. त्यांच्या जबाबानुसार नगरसेवक सागर राजू मुर्तडकर, त्याचा भाऊ सनी मुर्तडकर व आकाश मुर्तडकर तसेच शिवम शिंगटे (रा. वंजारगल्ली, मंगलगेट) आणि गणेश सुंभे (रा. भुतकरवाडी, बालिकाश्रम रोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरकर यांनी दिलेल्या जबाबानुसार, ते व्यवसाय करतात. 14 सप्टेंबर रोजी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास पाथरकर हे त्यांचा मित्र अमोल गायकवाड याच्यासोबत कारने नगर-पुणे रोडवरील राजश्री हॉटेलसमोर गेले होते.

मालाचे पैसे घेण्यासाठी देवा सुंभे यांच्याकडे त्यांचा व्यवहार होता. देवा सुंभे यांनी पैसे दिल्यानंतर तेथून निघून गेले. त्यानंतर पाथरकर व त्यांचा मित्र अमोल घरी जाण्यासाठी निघाले असताना सागर मुर्तडकर हा कारमधून तेथे आला. पाथरकर यांच्या जबाबानुसार, मुर्तडकर याने त्यांच्याकडे पाहून शिवीगाळ केली. याबाबत विचारणा केली असता धक्काबुक्की करून रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या गणेश सुंभे, शिवम शिंगटे, सनी मुर्तडकर व आकाश मुर्तडकर यांनी पाथरकर मारहाण केल्याचे जबाबात म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles