नूतन उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो… शिवसेना झाली आक्रमक

मालेगावच्या नूतन उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिक शासकीय कार्यालयामध्ये राष्ट्र पुरुषांच्या आणि देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपतींचे फोटो लावले जात असतात. पण, उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

शिवसेना नगरसेवकांनी निषेध करत तत्काळ फोटो काढण्याची मागणी केली आहे. पण, टिपू सुलतानचा फोटो लावला आहे, यात काहीही चुकीचं नाही, विरोध करणारे तुम्ही कोण? असा संतप्त सवालच उपमहपौरांनी विचारला आह.

. टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी आहे. माझ्या दालनामध्ये दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यानंतर फोटो बदलला जाईल. पण, आमच्या विचारधारेनुसार, हा फोटो पुन्हा लावणार आहोत. या फोटोवरून इतका वाद का होत आहे, ते कळत नाही. काही लोकांनी मुंबई कोर्टातमध्ये धाव घेतली होती. टिपू सुलतान यांची जयंती साजरी करू दिली नव्हती. त्यावेळी सरकारने कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं होतं. टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांना विरोध करू शकत नाही, असं म्हटलं आहे. मग हे विरोध करणारे कोण आहे? असा सवालच उपमहापौर शान ए हिंद यांनी उपस्थित केला

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles