अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे एप्रिल महिन्यात सात राज्यसभा सदस्यांची मुदत संपत असून, त्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जावे, अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलंय.
राज्यसभेच्या जागांबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, “एप्रिलमध्ये राज्यसभेच्या काही जागा रिक्त होत आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा विचार करता तिन्ही पक्षांचा मिळून एकच उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. कारण तिन्ही पक्षांचे काही सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेऊ,” असे त्यांनी सांगितले.तसेच शरद पवार यांच्या भूमिकेबाबत माहिती देताना संजय राऊत म्हणाले, “माझी मध्यंतरी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. शरद पवारांना राज्यसभेवर जाण्याच्या विषयांच्या संदर्भात मी त्यांचं मत विचारलं. तेव्हा शरद पवारांनी मला सांगितलं की राज्यसभेची ही निवडणूक ते पुन्हा लढवणार आहेत. मग आता यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात चर्चा सुरू आहेत. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत आणि 60 वर्षांपेक्षा जास्त संसदीय कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे शरद पवार यांनी जर ही भूमिका व्यक्त केली आहे आणि त्यांची ही भूमिका त्यांनी काँग्रेसला देखील सांगितली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत याबाबत चर्चा होईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांना आज देण्यात डिस्चार्ज येणार आहे. शरद पवारांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे आणि ते बरे झाले असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.शरद पवार यांच्या प्रकृतीची अपडेट देत डॉ परवेझ ग्रँट म्हणाले, आज आम्हाला आनंद झाला आहे… पवार साहेब यांची तब्येत चांगली आहे ते आज घरी जाणार आहेत… छोटसं छातीचं इन्फेक्शन झालं होतं… एक तासाने शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिक मधून सोडण्यात येणार… घरी जाऊन आराम करतील… चार-पाच दिवस घरीच आराम करतील पुण्यामध्ये नंतर बाहेर जाऊ शकता…. शरद पवार पूर्ण चांगले झाले आहेत…
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर शरद पवार यांच्या विविध वैद्यकिय चाचण्या करण्यात आल्या… रिपोर्ट आल्यानंतर काळजी करण्याचं काहीही कारण नाही.. असं देखील डॉक्टरांना सांगितलं.


