Thursday, February 19, 2026

Gold-Price: ‘व्हॅलेंटाईन डे’ला सोनं महागलं, १० ग्रॅमचा दर प्रतितोळा दर

दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि डॉलरच्या वाढत्या किंमतीमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. आज व्हॅलेंटाईन डेला सराफा बाजार उघडताच २४ तोळा सोनं प्रति तोळा १९७० रूपयांनी वाढले आहे. देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. लग्नसराईत सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक चिंतेत आहेत.२४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १५७,७५० रुपये इतकी झाली आहे. यामध्ये १९७० रूपयांची वाढ नोंदवली गेली. शक्रावर प्रति १० ग्रॅम १५५,७८० रुपये इतकी किंमत होती.

२२ कॅरेट सोन्याच्या किमतीमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रति १० ग्रॅम ₹१४४,६०० आहे. शुक्रवारच्या तुलनेत १८०० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली.

१८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ₹११८,३१० रूपये इतकी झाली आहे. १४७० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा ११६८४० रूपये इतकी होती.

२४ कॅरेट – १५७७५ रूपये – १९७ रूपयांची वाढ

२२ कॅरेट – १४४६० रूपये – १८० रूपयांची वाढ

१८ कॅरेट – ११८३१ रूपये – १४७ रूपयांची वाढ

जागतिक बाजारात डॉलरची किमत घसरले अथवा अमेरिका आणि इतर देशांमध्ये आर्थिक अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदी करतात. त्याशिवाय शेअर बाजारातील चढउतार आणि वाढती महागाई यामुळे सोन्याची गुंतवणूक वाढते. लग्न आणि सणांच्या हंगामात वाढत्या मागणीमुळे देशांतर्गत बाजारातही किमती वाढतात. आयात शुल्क आणि रुपयाची घसरती किंमतीमुळेही सोन्याचे दर वाढतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles