Thursday, February 19, 2026

सुनेत्रा पवार, पार्थ यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणार नाही…शरद पवार गटाची भूमिका

उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली होती. अजित पवार त्यासाठी आग्रही होते, असा दावा वारंवार शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे सांगत हा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचे घोडे अद्याप अडले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे.

बारामतीत आम्ही चार पाच जण सुनेत्रा पवारांना
भेटलो आणि त्यांना म्हटलं की, काही मदत लागली तर सांगा. कोणताही किंतू मनात बाळगू नका. विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत सुरु होती तेव्हादेखील सुनेत्रा वहिनींसोबत एकदोन वेळा भेट झाली होती. सुनेत्रा वाहिनी किंवा पार्थ पवार यांच्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह आहोत. त्यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. यावर आता अजितदादा गटाचे नेते काही प्रतिक्रिया देणार का, हे बघावे लागेल.‍

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles