Thursday, February 19, 2026

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींचे १५०० रुपये कायमचे बंद; ‘ती’ एक चूक पडली महागात

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत काही महिलांचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे. लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांना यापुढे दर महिन्याला १५०० रुपये मिळणार नाहीयेत. त्यांना एक चूक महागात पडली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना ईकेवायसी करण्यास सांगितले आहे. केवायसी करणे अनिवार्य होते. मात्र, अनेक महिलांनी अजूनही केवायसी केले नाही. केवायसी न केल्यामुळे त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीयेत. केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेबंर २०२५ होती. त्याआधी ज्यांनी केवायसी केले आहे. त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. इतर महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे.

अपात्र महिलांवर टांगती तलवार

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी केवायसी केले आहे. मात्र, केवायसी करताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या आहेत. यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. आता त्यांना चुक सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांना पुन्हा केवायसी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, यामध्ये महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला केवायसीमधील चुका दुरुस्त करायच्या आहेत. अन्यथा तुमचाही लाभ बंद केला जाईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles