मोठी बातमी! राज्यातील सर्वच ग्रामपंचायती शुक्रवारी बंद महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती शुक्रवारी, 20 फेब्रुवारी रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या तत्काळ निवडणुका घ्याव्यात. प्रलंबित ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती करावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येतंय. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयांचं कामकाज पूर्णतः ठप्प राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सरकार याबाबत काही तोडगा काढतोय का? ते पाहावे लागणारेय.


