Thursday, February 19, 2026

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक 17-02–2026 एकुण कांदा गोणी -1,17,470

लाल कांदा बाजार भाव

1 नंबर= 1100 ते 1350
2 नंबर= 800 ते 1100
3 नंबर= 450 ते 800
4 नंबर= 200 ते 450

केडगाव परिसरात घरफोडीत 2.19 लाखांचा मुद्देमाल लंपास
केडगाव परिसरातील जयहिंद कॉलनी, भुषणनगर येथील लिंक रस्त्यावरील सेवानिवृत्त व्यक्तीचा घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल दोन लाख 19 हजार 518 रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नंदकुमार लक्ष्मण शेजुळ (वय 72, रा. जयहिंद कॉलनी, भुषणनगर, केडगाव, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजेपासून ते 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने किचनमधील लोखंडी सेफ्टी दरवाजाचा कोयंडा तोडून तसेच मुख्य दरवाजा जबरदस्तीने उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाट उघडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन व कॅमेरा चोरून नेला. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये 9.540 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 6.450 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैनी, 1.120 ग्रॅमचे सोन्याचे पदक, दोन तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, 20 हजार रूपये रोख रक्कम, 25 ग्रॅम वजनाची चांदीची नाणी, कॅमेरा व मोबाईल यांचा समावेश आहे. एकूण दोन लाख 19 हजार 518 रूपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळ पंचनामा करण्यात आला असून डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट पथकानेही पाहणी केली आहे. 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी फिर्याद दाखल करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles