Thursday, February 19, 2026

खळबळजनक दावा… अजितदादांसाठी अडचण ठरणारी ती फाईल बंद करण्यास अमित शहांनी दिला होता नकार

अजित पवार यांचा अपघात नक्कीच संशयास्पद असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. दादांची फाईल बंद करण्यास अमित शहा यांनी नकार दिला होता. अजित पवार यांच्या विरोधात भाजप असे सुरू होते. यासोबतच त्यांनी म्हटले की, यानंतर अनेक संशयास्पद गोष्टी घडल्या. रोहित पवार हे फक्त राजकीय नेते नसून त्यांच्या कुटुंबातील महत्वाचे सदस्य आहेत. त्यांच्या कुटुंबाला संशय असेल आणि त्यांच्या कुटुंबाला जर सरकारवर विश्वास नसेल तर त्यांनी खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास केला तर याला तुम्ही सकात्मक बघितले पाहिजे.

संजय राऊत यांनी म्हटले की, माझ्या माहितीनुसार, त्यांच्या काही फाईल्स होत्या आणि त्याकरिता ते भाजपात गेले. ती फाईल पुन्हा उघडण्यात आली, अजित पवार यांच्या मृत्यू पूर्वी. खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जाचा विषय होता. ती फाईल इथून खास अमित शहा यांच्याकडे गेली, बंद करण्यासाठी.

पण अमित शहा यांनी ही फाईल बंद करू नये, असा निगेटीव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवली आणि त्यानंतर भाजपाचे मंत्री बोलायले लागले तुमची फाईल बंद झालेली नाही. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्री बोलायले लागले दादा तुमची फाईल आमच्याकडे आहे आणि तिथून ही सुरूवात झाली. ज्या कारणासाठी अजित पवार हे भाजपासोबत गेले, ते कारण संपलेच नाही.

राऊत यांनी म्हटले की, मग दादांनी पुन्हा मागे फिरण्याबाबत पुर्वविचार सुरू केला. तिथूनच या रहस्यमय घडामोडींना सुरूवात झाली. अमित शहा यांनी ती फाईल बंद करण्यास नकार दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles