सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. कोणताही सेलेब्रिटी नसून, एका विवाह सोहळा आणि त्यातही हळदी समारंभाचा एक खास क्षण आहे. पण यातील सगळ्यात लक्ष वेधणारा भाग म्हणजे त्या समारंभात झालेला डान्स. एका तरुणीनं दिलेला ठसकेबाज आणि आत्मविश्वासपूर्ण परफॉर्मन्स पाहून नेटकरी अक्षरशः घायाळ झाले आहेत.विवाह समारंभातील हळदीचा कार्यक्रम म्हटलं की, घरातल्या मंडळींमध्ये हास्यविनोद, संगीत, नाचगाणी आणि मजामस्तीचा माहौल असतो. पण या हळदी समारंभातही नेमकं तेच घडलं. जसं गाणं सुरू झालं, तसं या तरुणीनं एन्ट्री घेतली. संभळ वाजताच सगळ्यांचे लक्ष तिच्यावर खिळले. तिच्या अंगात आलेली ऊर्जा, चेहऱ्यावरील आत्मविश्वास, आणि डान्समधून दिसणारा उत्साह या सर्वांमुळे उपस्थितांनाच नव्हे, तर सोशल मीडियावरही लोक भारावून गेले आहेत.
या तरुणीनं साडी नेसूनही डान्स करताना ज्या सहजतेने स्टेप्स केल्या, त्यावरून तिच्या डान्सिंगवर असलेलं प्रेम स्पष्ट दिसत होतं. तिच्या हावभावांतून, हातवाऱ्यांतून आणि लयबद्ध हालचालींमधून तिनं उपस्थितांच्या मनात जागा मिळवली. फक्त संभळच्या तालावर तिनं केलेला डान्स एकदम मर्यादेत आणि हसतमुख पद्धतीने सादर केला.
लग्नात हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेहंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात काही ठिकाणी हळद खूप गाजवली जाते. अगदी डीजे, बॅंजो ठेवला जातो. या बेंजोवर सगळे थिरकतात, डान्स करतात मजा करतात. लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात.याच पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहा.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ kuki0130 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे


