उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत (Ajit Pawar Plane Crash) पहिल्यांदाच एक महत्त्वाची अधिकृत माहिती समोर आली आहे. विमानाच्या दोन्ही रेकॉर्डरवर भीषण आगीमुळे उच्च तापमानाचा दुष्परिणाम झाला असला तरी L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात यश आलं आहे. एएआयबीने यायबाबत अधिकृत माहिती दिली. संबंधित विमानात दोन रेकॉर्डर होते. बराच वेळ आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरनं नुकसान झालंय. आता कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरचा सखोल तांत्रिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या सगळ्या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही गृहमंत्री आणि हवाई उड्डाण मंत्री यांच्याशी संपर्क साधला आहे आणि आमच्याकडे असणारे पुरावे त्यांना सादर केले आहेत. आम्हाला आशा आहे याचा वापर होईल, असं रोहित पवार म्हणाले.
सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचं अपघातावर काय म्हणणं आहे?, असा प्रश्न रोहित पवारांना एबीपी माझाशी बोलताना विचारण्यात आला. यावेळी अपघात झाल्यानंतर याबाबत पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्याशी माझी चर्चा झाली होती. आता 13 दिवस झाल्यानंतर ते त्यांचं राजकारण करत आहेत. आम्ही आमचं समाजकारण करत आहोत. अजित पवारांच्या तेराव्या नंतर मी त्यांना भेटलो नाही, असं रोहित पवार म्हणाले.


