Thursday, February 19, 2026

Nissan Gravite भारतात लाँच …किंमत 5.65 लाख रुपये

Nissan Gravite बजेटमध्ये कार खरेदी करायची असेल तर ही बातमी वाचा. निसानने भारतात आपली कॉम्पॅक्ट एमपीव्ही कार लाँच केली आहे. ही कार बऱ्याच प्रमाणात रेनो ट्रायबरसारखी दिसते. बजेट 7-सीटर सेगमेंटमध्ये येणाऱ्या या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.65 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक उत्कृष्ट ऑफर्सची देखील घोषणा केली आहे. ज्यांना कमी बजेटमध्ये 7 सीटर कार हवी आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.

5.65 लाख रुपयांची ही खास किंमत फक्त पहिल्या 1,001 ग्राहकांसाठी आहे.

-बुकिंग बेनिफिट्स – पहिल्या 5,000 ग्राहकांना 5 वर्षांची मोफत देखभाल (सेवा), फायनान्स आणि अपग्रेड स्कीममध्ये मदत मिळेल.

-वॉरंटी अ‍ॅश्युरन्स – कारला 3 वर्ष किंवा 1 लाख किमीची स्टँडर्ड वॉरंटी मिळत आहे, जी 10 वर्ष किंवा 5 लाख किलोमीटरपर्यंत वाढवली जाऊ शकते.

स्पेशल एडिशन- पहिल्या 1,001 ग्राहकांना लाँच एडिशन मिळेल, ज्यामध्ये जेबीएल साउंड सिस्टम, एम्बिएंट लाइटिंग आणि डॅशकॅम सारखी अतिरिक्त फीचर्स असतील.

डॅशबोर्डवर 8 इंचाचा टचस्क्रीन आणि ड्रायव्हरसाठी 7 इंचाचा डिजिटल स्क्रीन आहे

ही एक 7-सीटर कार आहे जिच्या दुसऱ्या रांगेतील सीट सरकवून झुकवल्या जाऊ शकतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles