Thursday, February 19, 2026

टपरी लावण्याच्या कारणावरून वाद..मार्केट यार्डात दोन गटात तुफान राडा

मार्केट यार्ड महात्मा फुले चौक, परिसरात दोन गटात जोरदार वाद होऊन सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सहा जणांसह इतर १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस कर्मचारी अतुल केशव काजळे आणि होमगार्ड मुर्तजा सय्यद रात्री पेट्रोलिंग करत असताना त्यांना मार्केट यार्डात वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचले असता १० ते १५ जण एकमेकांना अश्लील शिवीगाळ करत आरडाओरड करत असल्याचे दिसून आले. यावेळी आरोपींनी रस्त्याकडेला असलेल्या एका बर्फाच्या टपरीवर लाकडी दांडक्यांनी हल्ला करून तिचे मोठे नुकसान केले. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी वाद सुरूच ठेवला.

​याप्रकरणी पोलिसांनी कुणाल दगडू हारबा, भारती अशोक बारसे, अमोल रघुनाथ हारबा, सार्थक अशोक बारसे (सर्व रा. सारसनगर) यांना ताब्यात घेतले आहे. तसेच प्रकाश बाबुराव भागानगरे, शिवतेज प्रकाश भागानगरे आणि इतर ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. टपरी लावण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कोतवाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles