Thursday, February 19, 2026

प्रशांत गायकवाड यांचे पारनेर बाजार समितीचे संचालक पद रद्द ;प्रशांत गायकवाड म्हणाले….

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक प्रशांत गायकवाड गेली दीड वर्षात संचालक मंडळाच्या बैठकीस अनेकदा गैरहजर राहिले. याचा ठपका ठेवत जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवशे यांनी त्यांचे संचालक पद रद्द करण्याची कारवाई केली.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही दिवसापूर्वी लेखापरीक्षण झाले होते. सहकार विभागाचे लेखापरीक्षक डी. आर. पाटील यांनी केलेल्या लेखापरीक्षणात संचालक मंडळाच्या बहुतांश बैठकीला गायकवाड गैरहजर राहिल्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांना पाठवला होता. त्या नुसार सुरवशे यांनी ही कारवाई केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड यांना कारवाईचा लेखी आदेश उपनिबंधकांनी बजावला आहे. सहकार कायदा नियम 73 अन्वये बाजार समिती सहकार निवडणूक प्राधिकरणकडे रिक्त जागेसंदर्भात अहवाल पाठविण्यात येणार आहे. यानंतर या जागेसंदर्भात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. गायकवाड हे तीनपेक्षा जास्त बैठकीला गैरहजर राहिले असल्याचा अहवाल आहे. बाजार पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना, अशी सत्ता आहे. स्थापनेच्या वेळी महाविकास आघाडी होती. मात्र निवडणुकी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले. यानंतर दोन्ही गटात अंतर्गत वादाला तोंड फुटलं. पुढे या वादातून काही संचालकांच्या पाठिंब्यातून बाजार समितीची चौकशीही लावली होती. परंतु या चौकशीत काही निष्पन्न झाले नाही. याच वादाचा हा परिणाम म्हणून गायकवाड यांचे पद गेल्याची चर्चा आहे.
दोनदा अविश्वास ठराव

प्रशांत गायकवाड यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीचे 2016 ते 2022 या काळात सभापती पद भूषविले. त्या काळात त्यांची चांगली कामगिरी होती. मात्र त्या काळात सुद्धा गटबाजीतून त्यांच्यावर दोनवेळा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. परंतु ते ठराव फेटाळून लावण्यात गायकवाड यांना यश आले होते.
प्रशांत गायकवाड म्हणाले…

लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांपासून मी एकदाही संचालक मंडळाच्या बैठकीस गेलो नाही. त्यामुळे ही कारवाई सहकार कायद्यानुसार झालेले आहे. याबाबत तक्रार करण्याचा किंवा आपिलात जाण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles