दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशीची मागणी सातत्याने केली जात आहे. अशातच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत “ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत” असं म्हटलंय. यासोबतच त्यांनी “महाराष्ट्रातील जनतेला या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे”, असं म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित केली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विमानामध्ये असलेलं अतिरिक्त इंधन, डॅमेज झालेला ब्लॅक बॉक्स आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी होणारा विलंब यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
मला विलिनीकरणावर बोलायचं नाही, पण एक विषय मांडतो. दोन पक्ष एकत्र आले असते, दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत. भावनिकदृष्टीकोनातून, जर विलिनीकरण झालं असतं तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे झाले असते. विलिनीकरणावर मी बोलणार नाही. कारण चर्चा भरकटते, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.


