विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; भेटीमागचं नेमकं कारण काय?

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी निवासस्थानी येऊन भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, खडसे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी आज सदिच्छा भेट घेऊन सर्वांना मोठा धक्का दिला. परिणामी, खडसे यांची पुढील राजकीय वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने होणार, याबाबत पुन्हा एकदा तर्कवितर्क सुरू झाले. जवळपास चार दशकांहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रिय राहिलेल्या खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतरही त्यांच्या भाजपमधील पुनरागमनाच्या चर्चा वेळोवेळी रंगत राहिल्या आहेत. विशेषतः विनोद तावडे यांच्या भेटीनंतर या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. मात्र, या चर्चा सुरू असतानाच एकनाथ खडसे यांनी मुंबईतील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी खासदा संजय राऊतही उपस्थित असल्याने राजकीय चर्चांना आणखी खतपाणी मिळाले.कीय वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने होणार, याबाबत पुन्हा एकदा तर्कवितर्क सुरू झाले.मात्र या भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधत मातोश्रीवरील भेटीमागील कारण स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, पुढील महिन्यात माझा अमृत महोत्सवी वाढदिवस समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाचे नियंत्रण देण्यासाठी मी कार्यकर्त्यांसमवेत उद्धव ठाकरे यांची सदिच्छ भेट घेतली. ही केवल निमंत्रणासाठी औपचारिक भेट होती. या भेटीचा कोणत्याही राजकीय घडामोडीशी आणि पक्षप्रवेशाशी संबंध जोडणे योग्य ठरणार नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles