लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट
महिलांच्या खात्यात लवकरच येणार पैसे
सामाजिक व न्याय विभागाचा निधी वितरित
लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा केले जातील. यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वितरित करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी आता निधी वितरित करण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. लाजकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून जवळपास ९८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे या निधीतून महिलांना आता हप्ता दिला जाणार आहे. येत्या काही दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. याची प्रोसेस सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात कधीही पैसे येऊ शकतात. निधी वितरित झाल्यानंतर तो अर्थ मंत्रालयाद्वारे लाडकी बहीण योजनेसाठी दिला जाईल. यामुळे या आठवड्याभरात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.
लाडकी बहीण योजनेत महिला जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता यावेळी एकच हप्ता देणार की दोन्ही हप्ते एकत्रितपणे देणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.


