श्रीगोंदा तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपी जेरबंद

कोकणगांव ता. श्रीगोंदा येथे वादातुन झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील 02 आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई.

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 16/01/2026 रोजी रात्री 10/00 ते 10/30 वा.चे सुमारास फिर्यादीचा मुलगा शुभम यांचे आरोपी महेश किरास चव्हाण रा.आढळगाव ता.श्रीगोंदा याचे सोबत दुपारी झालेल्या भांडणाचे कारणावरुन आरोपी नामे 1) महेश किरास चव्हाण, 2) शैला महेश चव्हाण, 3) मनसुख विश्रांती चव्हाण, 4) निखील अनिल शिंदे सर्व रा. आढळगाव ता.श्रीगोंदा 5) आयुर ईश्वर भोसले रा.श्रीगोंदा, 6) योगेश युवराज काळे रा.बिटकेवाडी ता.कर्जत व इतर अनोळखी तीन ते चार अश्यांनी फिर्यादीचे राहते घरासमोर येवुन गैरकायदयाची मंडळी जमवुन शुभम यास शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करत असतांना फिर्यादीचे पती सोडविण्यासाठी मध्ये गेले असता आरोपी महेश किरास चव्हाण याने त्याचे हातातील धारदार हत्याराने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने छातीत डाव्या बाजुस मारुन गंभीर जखमी केल्याने त्यांचेवर पुणे येथे उपाचर चालु असतांना भाऊसाहेब नामदेव राजपुत हे मयत झाले आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी दया भ्र. भाऊसाहेब रजपुत वय-41 वर्षे रा. कोकणगाव ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस ठाणे गु.र.नं. 35/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 189(2), 190, 191(2), 191(3), 351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्ह्यातील आरोपीतांना तात्काळ ताब्यात घेणेबाबत आदेशीत केलेले आहे.
सदर आदेशानुसार पोनि श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली वरील गुन्हा उघडकीस आणणेकामी पोउपनि/महादेव गुट्टे, समीर अभंग, पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, अमृत आढाव, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, सोनाल भागवत, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्ह्यातील आरोपीतांना ताब्यात घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना करण्यात आले होते.
पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचे माहिती प्राप्त करुन घेवुन आरोपींचे व्यवसायीक कौशल्याचे आधारे शोध घेत असतांना, दिनांक 18/02/2026 रोजी पथकास गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे महेश किरास चव्हाण रा.आढळगांव ता. श्रीगोंदा हा जामखेड रोड, हत्तीबारव ता.जि. अहिल्यानगर याठिकाणी असल्याची माहिती मिळाली. पथकाने सदर माहिती आधारे जामखेड रोड, हत्तीबारव येथे जावुन सापळा रचुन शिताफिने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) महेश किरास चव्हाण वय-25 वर्षे रा. आढळगाव ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, 2) शैला महेश चव्हाण वय-27 वर्षे रा. सदर असे असल्याचे सांगितले. पथकाने मिळुन आलेला इसम व महिला यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles