onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक 19-02–2026 एकुण कांदा गोणी -1,24,622
लाल कांदा बाजार भाव
1 नंबर= 1000 ते 1300
2 नंबर= 700 ते 1000
3 नंबर= 450 ते 700
4 नंबर= 200 ते 450
जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला
अहिल्यानगर: शहरातील बुऱ्हाणनगर ते कापूरवाडी रस्त्यावरील भूमी बेकरीसमोर जुन्या भांडणाची कुरापत काढून एका १७ वर्षीय तरुणाला हॉकी स्टिक आणि बेसबॉलच्या दांडक्याने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार कैलास शेलार (वय १७, रा. बुऱ्हाणनगर) हा तरुण १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास रस्त्याने जात असताना आरोपींनी त्याला अडवले. यावेळी अभि गोरख चाडगे, सिद्धार्थ नवले, युवराज जाधव आणि सलमान शेख (सर्व रा. कापूरवाडी व बुऱ्हाणनगर) यांनी जुन्या वादाचा राग मनात धरून ओमकारला अवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद वाढल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील हॉकी स्टिक, बेसबॉलचे दांडके आणि फायटरने ओमकारवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ओमकार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या साईदीप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण केल्यानंतर ‘जर तू पोलिसांत तक्रार केली, तर तुझ्या आई-वडिलांना जिवंत मारून टाकू’, अशी धमकीही आरोपींनी दिली.
या घटनेनंतर घाबरलेल्या ओमकारने १८ फेब्रुवारी रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक एस. एस. शेख हे करत असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.


