Thursday, February 19, 2026

छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघे नगर शहर दुमदुमले, हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग

शिवजयंतीनिमित्त शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रा उत्साहात
छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले, हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
महाराजांच्या जिवंत देखाव्यांनी वेधले लक्ष
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंती उत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन आहिल्यानगर, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जय छत्रपती शिवाजी, जय भारत पदयात्रा काढण्यात आली. यात जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शाळा, महाविद्यालयाचे हजारो विद्यार्थी अणि जिल्हा क्रीडा संकुल मधील विविध खेळाच्या प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू सहभागी झाले होते.
जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही पदयात्रा सुरू झाली. प्रारंभी शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. याप्रसंगी यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आयुक्त यशवंत डांगे, महापौर ज्योतीतार्इ गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, विशाल गर्जे, प्रविण कोफ्लढावळे, प्रियंका खिंडरे, रमेश जगताप, संतोष वाबळे, जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सेक्रेटरी ॲड. विश्‍वासराव आठरे, मुकेश मुळे, जयंत वाघ, दीपलक्ष्मी म्हसे, बाळासाहेब सागडे, विजयकुमार पोकळे, संजीव भोर, क्रीडा संघटनेचे शैलेश गवळी आदींसह शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, जिल्हा क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
केंद्रीय युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यामंध्ये जय छत्रपती शिवाजी, जय भारत पदयात्रा काढण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्हा क्रीडा कार्यालयाचा या पदयात्रेत सहभाग होता. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पदयात्रेत विद्यार्थ्यांचे लेझीम पथक व दांडपट्टा, तलवारबाजी प्रात्यक्षिके नागरिकांची आकर्षण ठरली. पोलीसांच्या बॅण्ड पथकाने सादर केलेले महाराष्ट्र गीत व शाहीरांचे पोवाडे, संबळच्या निनादाने उपस्थितांची मने जिंकली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि विविध महापुरुषांच्या वेशभुषेतील विद्यार्थी, घोड्यावर स्वार शिवाजी महाराज व मावळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. वाहतुकीचे नियमन व पर्यावरण संवर्धणाचा विद्यार्थ्यांनी संदेश दिला. भगव्या ध्वजांनी सर्व परिसर व्यापला होता. घोड्यांच्या रथात शिवाजी महाराज आणि विविध जिवंत देखाव्यांनी या पदयात्रेची शोभा वाढवली. यामध्ये विविध क्रीडा प्रकारासह लेझीम, दांडपट्टा, तलवारबाजीचे धाडसी प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा वेस, आशा टॉकीज, कापड बाजार, तेलिखुंट, चितळे रस्ता, चौपाटी कारंजामार्गे दिल्लीगेट ते रेसिडेन्सिअल हायस्कूल दरम्यान यात्रेचा समारोप झाला. यामध्ये एकविध जिल्हा क्रीडा संघटना, पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र व विविध खेळ प्रशिक्षण केंद्राचा सहभाग लाभला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles