Friday, February 20, 2026

अजित पवार विमान अपघात प्रकरण सत्य समोर येणार, प्राथमिक अहवाल …

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला नसून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अपघात प्रकरणाची कसून चौकशी केली जावी अशी मागणी पवार कुटुंबीयांसह अनेक राजकीय नेत्यांनी केली. अजित पवार यांच्या विमान अपघातामागचे सत्य लवकरच समोर येणार आहे. अजित पवारांच्या विमाना अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वी येणार असल्याचे सांगितले जात आहे. सर्वाचे लक्ष या प्राथमिक अहवालाकडे लागले आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या विमाना अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ तारखेपूर्वी येणार आहे. डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या डाउनलोड झाला आहे. त्यामुळे अपघातावेळी नेमकं काय घडलं होतं याची संपूर्ण माहीती समोर येईल. याचसोबत कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला (CVR) उष्णतेमुळे नुकसान झाल्याची माहिती देखील सांगितली जात आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार आणि जय पवार यांना घातपात असल्याचा संशय आहे. संपूर्ण पवार कुटुंबाला वाटत आहे की हा अपघात नसून घातपात आहे. रोहित पवार यांनी आतापर्यंत दोन पत्रकार परिषद घेत अजितदादांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित करत संशय व्यक्त केला. अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. तर अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, अशी मागणी केली. व्हीएसआर कंपनीला विमानाचे उड्डाण करण्यास तात्काळ बंदी घालावी, असे देखील ते म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारीला अपघात झाला होता. बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. अजितादाद मुंबईवरून बारामतीला जात होते. पण बारामतीत पोहचण्यापूर्वीच त्यांच्या विमानाला अपघात झाला. अजितदादा जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी बारामतीला निघाले होते. या अपघातामध्ये अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा हादरला बसला. या प्रकरणाचा तपास सध्या केला जात आहे. हा अपघात कशामुळे झाला यामागचे कारण लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles