Friday, February 20, 2026

अजित पवार जेव्हा हयात होते, तेव्हा तुम्ही त्यांचेसोबत कसे वागला? हे लोकांना माहित नाही का?

आमदार रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषद आणि माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

रोहित पवार अपघाताचे राजकारण करत असून लोकांचा बुद्धिभेद करत आहेत, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. या टीकेला रोहित पवार यांनी ट्विटरवरुन पलटवार केला. त्यानंतर, आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा रोहित पवार यांना काही सवाल केले आहेत. अजित पवार यांच्या विमान दुर्घटेनसंदर्भात बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री सक्षम असून चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या कुटूंबियांनी CBI चौकशीची मागणी केली, सरकार त्याबद्दलही विचार करेल. कुटुंब आणि राज्यातील जनतेला या अपघाताची माहिती मिळाली पाहिजे हा अधिकार आहे. विमान अपघातची घटना दुख:दायक आहे, सर्वांनाच त्याच दुख: झालय. पण, दुर्देवाने रोहित पवार ते माध्यमांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतायत हे क्लेषदायक आहे, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला.
अजित पवारांसोबत तुम्ही कसे वागलात?

अजित पवार जेव्हा हयात होते, तेव्हा तुम्ही त्यांचेसोबत कसे वागला? हे लोकांना माहित नाही का? तुम्ही आणि काका ( शरद पवार ) कसे वागले? अजित पवारांना तुम्ही कधी सन्मान मिळू दिला का? असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. कॉग्रेसच्या काळात राष्ट्रवादीच्या जागा येऊन देखील त्यावेळी अजित दादांना मुख्यमंत्रीपदाची संधी कोणी नाकारली. अपघाताच भांडवल करण्यापेक्षा अगोदर याचं उत्तर महाराष्ट्राला द्या, असे म्हणत रोहित पवार यांच्या भूमिकेवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची जेव्हा संधी होती तेव्हा ती का मिळू दिली नाही? याच उत्तर देखील राज्यातील जनेतला मिळाव ही माझी अपेक्षा, असे म्हणत विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यासह थेट शरद पवार यांनाही लक्ष्य केलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles