Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर शहरात अल्पवयीन मुलीवर लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार; आरोपी अटकेत

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवुन बळजबरीने शारीरीक संबंध ठेवुन गर्भवती करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचेकडुन जेरबंद.

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, आरोपी नामे हमीद शौकत सय्यद रा. लोंढे मळा, कल्याण रोड ता. जि.अहिल्यानगर याने फिर्यादी यांची अल्पवयीन नात वय – 17 वर्षे हिचेशी तिचे अज्ञानाचा गैरफायदा घेवुन तसेच तिला लग्नाचे अमीष दाखवुन वारंवार तिच्याशी शारिरिक संबंध ठेवुन तिला गर्भवती केले आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 103/2026 भारतीय न्याय सहिंता 2023 चे कलम 64(2)(m), 69, 351(2)(3), सह बालकांचे लैंगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनिय 2012 चे कलम 4, 6, 8, 12 गुन्हा दाखल आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखे पोउपनि/दिपक मेढे पोलीस अंमलदार गणेश लबडे, फुरकान शेख, दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, सुनिल मालणकर, योगेशे कर्डिले, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिवाजी शिंदे, सुर्वणा गोडसे, चालक उत्तरेश्वर मोराळे, अर्जुन बडे यांचे पथक तयार करुन सदर गुन्ह्यातील आरोपीस शोध घेवुन तात्काळ ताब्यात घेणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते.
वरील पथकाने गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे हमीद शौकत सय्यद रा. लोंढे मळा, अहिल्यानगर याचे शोध घेत असतांना दिनांक 21/02/2026 रोजी पथकास गुप्त बातमीदारामार्फत गुन्ह्यातील आरोपी हा आण्णाभाऊ साठे चौक, लाल टाकी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने सदर ठिकाणी जावुन खात्री करता लाल टाकी परिसरात एक इसम संशयीत रित्या उभा असल्याचे दिसुन आला. तेव्हा पथकाने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारता त्याने त्याचे नांव हमीद शौकत सय्यद वय – 24 वर्षे रा. लोंढे मळा, कल्याण रोड, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यास सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे.
पथकाने ताब्यातील आरोपी नामे हमीद शौकत सय्यद वय – 24 वर्षे रा. लोंढे मळा, कल्याण रोड, अहिल्यानगर यास पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles