Monday, February 23, 2026

पाथर्डी तालुक्यात आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसावर कुर्‍हाडीने हल्ला

पाथर्डी -तालुक्यातील आल्हनवाडी शिवारात आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.21) सकाळी घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कान्स्टेबल संजय मोतीराम जाधव हे एका गुन्ह्यातील आरोपी कृष्णा हौसराव कर्डिले यास अटक करण्यासाठी स्टाफसह आल्हनवाडी येथे गेले असताना आरोपी कृष्णा कर्डिले व त्याच्या कुटुंबियांनी पोलीस पथकाला विरोध करत शिवीगाळ, दमदाटी व झटापट केली.

यावेळी कृष्णा हौसराव कर्डिले याने आज एकाचा तरी जीव घेतो अशी धमकी देत हातातील कुर्‍हाडीने पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाधव यांनी तो वार चुकविल्याने मोठी दुर्घटना टळली. तसेच आदिनाथ त्रिंबक गोल्हार याने आरोपीस मोटारसायकलची चावी देऊन घटनास्थळावरून पळून जाण्यास मदत केल्याचे तक्रारीत नमूद आहे.याप्रकरणी आरोपी कृष्णा हौसराव कर्डिले, हौसराव ज्ञानदेव कर्डिले, मनीषा हौसराव कर्डिले, समर्थ हौसराव कर्डिले व आदिनाथ त्रिंबक गोल्हार (सर्व रा. आल्हनवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक निवृत्ती आगरकर करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles