Monday, February 23, 2026

Video : गोलाकार पुऱ्या बनवल्या झटपट पटापट ; तरुणाची भन्नाट ट्रिक होतेय व्हायरल

भारतात देसी जुगाड करणाऱ्यांची कमी नाही, अगदी खाण्यापासून ते फिरण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला लोक काहीना काही जुगाड करताना दिसतात. या जुगाडच्या मदतीने कठीण काम सोपे केले जाते. सध्या सोशल मीडियावर झटपट पटापट पुऱ्या बनवण्याचा असाच एक जुगाड व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हिडीओत एक तरुण पोळपाट न वापरता चक्क एक भांड्याच्या साहाय्याने गोलाकार पुऱ्या बनवतोय. बऱ्याचदा सणसमारंभावेळी किंवा घरात पाहुणे येताच पुऱ्यांचा बेत आखला जातो. पण पुऱ्या लाटून तळण्याचं काम फार कंटाळवाणे वाटते. पण या व्हिडीओत तरुणाने पुऱ्या बनवण्याच काम अगदी सोप करुन दाखवलयं. व्हिडीओत पाहू शकता की, एक तरुण न लाटता काही मिनिटांत गोल पुऱ्या बनवतोय. यावेळी प्रथम तो पिठाचे छोटे गोळे बनवून घेतो. नंतर, एका लहान भांड्याच्या तळाला तेल लावतो आणि पिठाचा गोळा खाली ठेवून वरुन जोरात दाबतो. अशाप्रकारे काही सेकंदात तो मस्त गोलाकार पुऱ्या बनवतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles