नोकरी देण्याचे आमिष दाखवून आणि ब्लॅकमेलिंग करुन शहराचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी तरुणीवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता पुन्हा एका तरुणीने अभिषेक कळमकर यांच्या विरोधात धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. नोकरी देण्याच्या आमिषाने नको तेथे हात लावला असल्याचे सांगत तरुणीने तोफखाना पोलिसांत धाव घेतलीय.प्रचारा दरम्यानच मला तू खूप आवडली होतीस असे म्हणत… नको तेथे हात लावला. नको ते बळजबरीने केले. तसेच तू जर कोठे बोलली तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून शिवीगाळ केली असे पिडित तरुणीने म्हटले आहे.
अभिषेक कळमकरच्या घराची पोलिसांकडून झडती
शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत शहराचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचारा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हा गुन्हा तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून मंगळवारी सकाळी पोलिसांनी अभिषेक कळमकर यांच्या घराची घडती घेतली. यावेळी पोलिसांनी काही कागदपत्रे आणि इलेक्टॉनिक वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.नोकरीच्या आमिषाने आणि ब्लॅकमेलिंग करुन माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल शनिवारी दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कळमकर फरार आहेत. पोलिसांची दोन पथके त्यांच्या मागावर आहेत. तरुणीला नगर शहरातील विविध ठिकाणी तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन अत्याचार केला आहे. मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून वेळोवेळी कपडे काढण्यास भाग पाडून तासनतास त्रास देत असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग केल्याचाही आरोप करत या संदर्भातील काही व्हिडिओ पुरावेही पीडितेने पोलिसांकडे जमा केले आहेत. दरम्यान हा गुन्हा तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्यानंतर तोफखाना पोलिसांच्या पथकाने अभिषेक कळमकर यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी छापा टाकला. या छाप्यामध्ये महत्वाची कागदपत्रे, इलेक्टॉनिक साहित्य ताब्यात घेतले आहे.


