वाल्मिक कराडला मोठा धक्का,कराडच्या मुलाची खळबळ उडवून देणारी पोस्ट; धनंजय देशमुख भडकले

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा एकदा तापलं आहे. आरोपी वाल्मिक कराडच्या मुलाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे बीडमधील सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. आरोपी कराडचा मुलगा सुशीलने केलेल्या पोस्टवर धनंजय मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. धनंजय देशमुख म्हणाले, सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापेक्षा समोर येऊन सत्य सांगावे. कोणाच्या आश्रयाने हिंमत आली? कोण दिली ताकद?” असा थेट सवाल धनंजय देशमुख यांनी केला. न्यायालय, शासन आणि मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज करण्याची भाषा होत असल्याचा आरोप देखील धनंजय यांनी केला. बेल अर्जापासूनच मिरवणुकीचे स्वप्न पाहिले जात होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

आरोपी वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव सुशील कराड असे आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर आरोप झाला. तेव्हापासून वाल्मिक कराड हा जेलमध्ये आहे. आता त्याच्या मुलाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्याची पोस्ट चांगलीच व्हायरलं झाली. ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार ‘ असं सुशील कराडने म्हटलं. त्यामुळे आता सुशील कराड काही गौप्यस्फोट करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं.

वाल्मिक कराडचा सुप्रीम कोर्टातही जामीन फेटाळला

वाल्मीक कराडने हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. सुप्रीम कोर्टात जामीन अर्ज फेटाळल्याने पुढील एक वर्षासाठी वाल्मीक कराड जेलमध्येच असणार आहे. वाल्मीक कराडला एक वर्षानंतर नवीन जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles