Kitchen महाराष्ट्रातामध्ये पुरणपोळीला विशेष मान आहे आणि प्रत्येक सणासुदीला ती आवर्जून केली जाते. मात्र पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी बनवताना डाळ शिजवणे, ती गाळणे आणि पुरण तयार करणे या प्रक्रिया खूप वेळखाऊ असतात, त्यामुळे अनेकांना ती करण्याचा कंटाळा येतो.
पण प्रसिद्ध युट्युबर Tejashri Dokhe यांनी सांगितलेल्या इंस्टंट पुरणपोळी प्रिमिक्समुळे हे काम अगदी सोपं झालं आहे. या पद्धतीत ना डाळ वेगळी शिजवावी लागते, ना जास्त भांडी वापरावी लागतात, आणि फक्त 10 मिनिटांत मऊ, लुसलुशीत पुरणपोळी तयार होते.
प्रिमिक्स म्हणजे आधीच तयार करून ठेवलेलं कोरडं मिश्रण. जेव्हा पुरणपोळी करायची असेल तेव्हा फक्त पाणी किंवा दूध घालायचं आणि पटकन पोळी बनवायची.यामुळे वेळ वाचतो आणि चव छान येते. त्याच प्रमाणे भांडी कमी लागतात.
दोन कप चणा डाळ
दोन कप गूळ
चार कप पाणी
चिमूटभर हळद
एक चमचा तेल


