नेवासा तालुक्यातील वांजोळी व घोडेगाव येथे गावठी कट्टा बाळगणार्या दोघा आरोपींकडून 2 गावठी कट्टे व 4 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अटक केलेल्या एका आरोपीवर 9 तर दुसर्या आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांत 18 गुन्हे असे दोघांवर 27 गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, दीपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथकाने सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत नितीन उर्फ ठकन भाऊसाहेब आल्हाट रा. मोरेचिंचोरे ता.नेवासा हा चारचाकी वाहनातून गावठ्ठी कट्टा विक्री करण्यासाठी वांजोळी शिवारात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.त्यानुसार पथक वांजोळी शिवारात सापळा लावून थांबले असता वांजोळीकडुन एमआयड़ीसीकडे एक पांढर्या रंगाचे चारचाकी वाहन येताना दिसले. पथकाने वाहन थांबविले असता चालक वाहन थांबवूृन पळुन जावू लागला तेव्हा पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. याने त्याचे नाव नितीन उर्फ ठकन भाऊसाहेब आल्हाट (वय 34) रा. मोरेचिंचोरे ता.नेवासा असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमाची व कारची झडती घेतली असता त्याचे कब्जातून 30 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, 5 लाख रुपये किमतीचे मारुती सुझुकी चारचाकी वाहन असा 5 लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नितीन उर्फ ठकन भाऊसाहेब आल्हाट याचेविरुद्ध पोलीस हवालदार सोमनाथ झांबरे यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 78/2026 आर्म ऍक़्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत. नितीन आल्हाट याचेवर यापूर्वी सोनई पोलीस ठाण्यात 5, एमआयडीसी अहिल्यानगर पोलीस ठाण्यात एक, येरवडा (जि. पुणे) पोलीस ठाण्यात एक तसेच नेवासा व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे मारामारी, आर्म अॅक्ट, जीवे मारण्याचा प्रयत्न असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत.


