Tuesday, March 3, 2026

खळबळजनक दावा….अजित पवारांच्या विमान अपघातातील पायलट जिवंत?

अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील पायलट सुमित कपूर जिवंत असल्याची माहिती समोर येत असल्याचा खळबळजनक दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेवर अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक मुद्दे उपस्थित केले. या विमान अपघात प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या चौकशीवर देखील अमोल मिटकरी यांनी असमाधान व्यक्त केले. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांच्यासोबत देखील अमोल मिटकरी दिसून आले. या प्रकरणी मिटकरी यांनी आणखी काही दावे केले आहेत.

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी तपास कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहचता नाही. अपघातासाठी दिलेले हवामानाचे कारण पटत नाही. विमान रडारवरून अचानक गायब झाले, लँडिंग गिअरसोबतही छेडछाड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. इंधनात काही घटक असे समाविष्ट केले होते का? ज्याने हवेत असताना इंजिन बंद पडले. या विमानातील पायलट सुमित कपूर जिवंत असल्याचीही माहिती येते. सुमित कपूर कॅलिफोर्नियात असल्याची माहिती आहे. सुमित कपूर जर जिवंत असतील तर याचा अर्थ DGCA ने आधी ६ माणसे विमानात होती सांगितले, त्यानंतर ५ जणांचा मृतदेह सापडला, असं सांगितले. याचा अर्थ त्या विमानात सुमित कपूर नव्हता. शांभवी पाठक विमान चालवत होती का..? असेही प्रश्न मिटकरींनी उपस्थित केले.

VSR कंपनी आणि त्यांच्या विमानावर ताशेरे ओढले आहेत. मग एफआयआर नोंदवून घेताना इतका संघर्ष का करावा लागत आहे. शेवटपर्यंत पोलिसांनी हा एफआयआर नोंदवून घेतला नाही. मग हाती काय येणार आहे?, माझ्या विवेकबुद्धीला जे पटते ते मी बोलतो, मी जे बोलतो ते चुकीचे नाही, हे मला माहिती आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. आता इतर आमदार का बोलत नाही हे माहिती नाही, असे मिटकरींनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles