राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु होऊन आता दीड वर्ष झाले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. विधानसभेच्या निवडणूकीआधी ही घोषणा केली होती. त्याचवेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचीही घोषणा केली होती. दरम्यान, योजना सुरु होऊन आता दोन वर्ष होतील तरीही योजनेचा हप्ता वाढवलेला नाही. लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० वरुन २१०० करण्याची घोषणा आधीच केली होती. परंतु अजून याची अंबलबजावणी झालेली नाही. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा होईल,असं वाटलं होतं. मात्र, त्यावेळी अशी कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात तरी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.राज्य सरकार ६ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या जातील. यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजुर केला जाईल. त्याचदरम्यान, २१०० रुपयांबाबत घोषणा होणार की नाही याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.यंदाचा २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर आता अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्प ६ मार्चला सादर करणार आहे.
राज्य सरकार करणार मोठी घोषणा ; लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार?
- Advertisement -


