शिक्षक नेत्याला सेवापुर्तीच्या कार्यक्रमातच राजकारणात सक्रीय होण्याचे आमंत्रण, अनेकांच्या भुवया उंचावल्या
नगर – अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नाशिक विभागीय अध्यक्ष तसेच नगर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक संजय आप्पासाहेब धामणे हे ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून केंद्रप्रमुख पदावर असताना सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा सारोळा कासार (ता.नगर) येथील कर्मवीर विद्यालयात पार पडला. यावेळी जिल्हाभरातून शिक्षण व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात आ. काशिनाथ दाते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्यासह अनेकांनी आता राजकारणात सक्रीय होत नवी इनिंग सुरु करण्याचे जाहीर आमंत्रण दिल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्याचे पहावयास मिळाले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत संभाजी औटी व सुभाष धामणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते रा.या.औटी होते. या कार्यक्रमासाठी आ.काशिनाथ दाते, भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, खरेदी विक्री संघाचे सभापती रावसाहेब शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले,बाळासाहेब हराळ, वसंत चेडे, रभाजी सुळ, संतोष म्हस्के, दिपक कार्ले, अभिलाष घिगे पाटील, अशोक झरेकर, दादा दरेकर,उद्योजक संजय गारुडकर, प्रभाकर घोडके, अकोळनेर सरपंच प्रतिक शेळके, रामदास झेंडे, संजय कडूस, संजय काळे ,महेश धामणे, भानुदास धामणे, राजाराम धामणे, उद्योजक नामदेव धामणे, शिवाजी कडूस, जयप्रकाश पाटील, धोंडीभाऊ कडूस, डॉ. बाबासाहेब कडूस, गोराभाऊ काळे, शिवाजी लिंभोरे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सिताराम सावंत, विजय महामुनी, प्राचार्य संपतराव काळे, लहू चोभे, पंचक्रोशीतून आलेले विविध गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन व संचालक उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने शिक्षणाधिकारी अरुण धामणे ,प्रकल्प संचालक पुणे बाबुराव जाधव, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब साठे, पोपट धामणे, केंद्रप्रमुख सुनील नरसाळे, दत्तात्रय कडूस, उत्तम भोसले, अंबादास गारुडकर,महादू उधार उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आ. काशिनाथ दाते यांनी आपल्या मनोगतात संजय धामणे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कार्याविषयी गौरव उद्गार काढले.
शासकीय सेवेत असताना शिक्षण सेवेला प्रथम प्राधान्य देत तळागाळातील विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षण दिले हे करत असताना समाजाशी नाळ कधीही तुटू दिली नाही. पर्यायाने गावातील ग्रामपंचायत,सोसायटी या दोन्ही संस्था अनेक वर्षे सेवेत असताना ताब्यात ठेवल्या आता तर सेवानिवृत्त झाली म्हणजे खऱ्या अर्थाने एक इनिंग संपून दुसरी चालू झाली आहे आजपर्यंतच कर्तृत्व जर पाहिले तर नक्कीच या व्यक्तिमत्त्वाला राजकीय दृष्ट्या भविष्य चांगले असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी उपस्थित अनेक मान्यवरांनी संजय धामणे यांच्या आजपर्यंतच्या संघर्षमय जीवनावर अनेक महत्वाचे प्रसंग सांगून मनोगते व्यक्त केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना व जिल्हाभरातून प्रत्येक तालुक्यातून उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी संजय धामणे यांच्या सारखा लढवय्या नेता सेवानिवृत्त होणे म्हणजे संघटना आणि प्रशासन यात खूप मोठी कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण होणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
संजय धामणे यांची कन्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संभाजीनगर कु.प्रियंवदा धामणे, पत्नी शोभा धामणे यांनीही मनोगत व्यक्त करताना सर्वांना भावनिक केले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी सारोळा कासार मधील जिल्ह्यात सर्वत्र कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची सेवापूर्ती गौरव सोहळा समिती गठित केलेली होती या सर्व संयोजन समितीचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे शेवटी सर्वांचे आभार ऋषिकेश गोरे यांनी मानले आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय जाधव यांनी केले.
नगर तालुक्यातील शिक्षक नेत्याची राजकारणात होणार एंट्री ! सेवापुर्तीच्या कार्यक्रमातच….
- Advertisement -


