अहिल्यानगर -तालुक्यातील दोन गावांमधून दोन दिवसांत दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या असून, या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तालुक्यातील एका गावात राहणारे 48 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलीला (वय 17) सोमवारी (2 मार्च) सकाळी 11.30 ते 12.30 वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले. याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने दुसर्या दिवशी मंगळवारी (3 मार्च) अहिल्यानगर तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.दुसर्या घटनेत 33 वर्षीय महिलेले दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या मुलीला (वय 16) सोमवारी (2 मार्च) रात्री 10.30 ते मंगळवारी (3 मार्च) पहाटे दोन वाजताच्या दरम्यान राहत्या घरातून अज्ञात इसमाने पळवून नेल्याचे नमूद आहे. रात्री मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचा प्रकार पहाटे दोन वाजता लक्ष्यात आल्यानंतर फिर्यादीसह नातेवाईकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून मुलीचा शोध सुरू केला आहे.


