Saturday, March 7, 2026

Ahilyanagar…..नगरसेवकाला पिस्तूलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

राहता महाराज यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर दुसऱ्याला का दिले, असा जाब विचारत नगरसेवक दशरथ तुपे व त्यांचे बंधू पांडुरंग तुपे यांना पिस्तूलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शहरातील तुषार सदाफळ व त्याच्यासोबतच्या १०-१२ जणांविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांडुरंग तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ मार्च रोजी तुषार सदाफळ याने फोनवरून तुमचा भाऊ नगरसेवक झाला आहे, यात्रेतील पाळण्याचे टेंडर बाहेरच्या माणसाला देऊन माझ्या पोटावर पाय देणार का? असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर आरोपीने आपल्याजवळील परवानाधारक पिस्तूल काढून गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर, रात्री १०:३० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुंड प्रवृत्तीची माणसे जमा करून याचा काटाच काढू अशी प्रक्षोभक विधाने करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.नगरसेवक दशरथ तुपे बानी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोपीच्या या कृत्यामुळे माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाला असून आम्ही भयभीत आहोत. शिवाजी चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवावी आणि आम्हाला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक कोमल कुमावत पुढील तपास करत आहेत.

या घटनेनंतर नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, गटनेते मुन्नाभाई शाह यांच्यासह सर्व नगरसेवकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. राहाता शहरात कोणीही गुंडागर्दी किंवा दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी खंबीर आहोत, असा इशारा नगराध्यक्ष डॉ. गाडेकर यांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles