Wednesday, March 11, 2026

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक 9-03–2026 एकुण कांदा गोणी -51,832
लाल कांदा बाजार भाव

1 नंबर= 1150 ते 1400
2 नंबर= 800 ते 1150
3 नंबर= 400 ते 800
4 नंबर= 150 ते 400

श्रीपाद छिंदमवर गुन्हा दाखल
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातून बाहेर जाण्याचे आदेश असतानाही आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीपाद शंकर छिंदम याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक यांनी ६ मार्च रोजी दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत श्रीपाद छिंदम याला अहिल्यानगर शहराच्या हद्दीतून निघून जाण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची प्रत त्याच्या घराच्या दर्शनी भागात चिकटवून अंमलबजावणी करण्यात आली होती.मात्र, शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास दिल्लीगेट परिसरात श्रीपाद छिंदम दिसून आला.

पोलीस हवालदार बाबासाहेब मंजाबापू इखे आणि त्यांचे पथक तिथे बंदोबस्तावर तैनात होते. प्रशासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलीस हवालदार बाबासाहेब इखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये छिंदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles