Tuesday, March 10, 2026

नगरमध्ये पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेत भ्रष्टाचार उघड ; पतसंस्थेत सत्तांतर

पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेत सत्तांतर
जगदीश वाघ चेअरमन, किशोर सांगळे व्हाईस चेअरमन
सभासदांच्या हितासाठी पारदर्शक कारभार करण्याचा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा निर्धार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील किरण आव्हाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
संस्थेच्या चेअरमन पदासाठी झालेल्या मतदानात जगदीश भगवान वाघ यांना बहुमत मिळाले. एकूण झालेल्या मतदानात 16 विरुद्ध 5 मतांनी जगदीश वाघ यांची चेअरमनपदी निवड झाली. संचालक मंडळातील बहुसंख्य सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांची निवड स्पष्ट बहुमताने झाली. तर व्हाईस चेअरमन पदासाठी किशोर धोंडीराम सांगळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवड प्रक्रियेनंतर संस्थेच्या कामकाजाबाबत काही संचालकांनी मत व्यक्त केले. यावेळी विकास पॅनलचे अध्यक्ष किशोर गांगर्डे यांनी मावळत्या चेअरमनवर टीका करताना सांगितले की, एकाधिकारशाही पद्धतीने मनमानी कारभार केला जात होता. त्यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव मंजूर झाल्यानंतरही पदाचा मोह सुटत नव्हता. संस्थेतील काही कामकाजात भ्रष्टाचार उघड झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
यावेळी उपस्थित संचालकांनी संस्थेच्या भविष्यासंदर्भात सकारात्मक भूमिका व्यक्त केली. संचालक मंडळाच्या वतीने सभासदांच्या हिताचा विचार करून पारदर्शक व विकासाभिमुख निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देण्यात आली.
नवनिर्वाचित चेअरमन जगदीश वाघ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, संस्थेच्या सभासदांचा विश्‍वास कायम ठेवणे हीच आपली प्राथमिकता राहील. पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीत अधिक मजबुती आणण्यासाठी तसेच सभासदांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. संस्थेची भरभराट आणि सभासदांचे हित हेच ध्येय ठेवून काम करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या निवडीमध्ये विकास पॅनलने एकजूट दाखवत चेअरमन निवड प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. संचालक मंडळातील सदस्यांच्या एकमतामुळे निवड प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे सांगण्यात आले.
निवड प्रक्रियेनंतर उपस्थित संचालक व सभासदांनी नवनिर्वाचित चेअरमन जगदीश वाघ आणि व्हाईस चेअरमन किशोर सांगळे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी सत्ताधारी संचालक मंडळाने गुळालाची उधळण करून जल्लोष केला.
या वेळी संस्थेचे माजी चेअरमन भानुदास कल्हापुरे, दत्तात्रय गडाख, सर्जेराव ठोंबरे, तसेच संस्थेचे माजी चेअरमन व मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन बाळकृष्ण काळे व संचालक संभाजीराव मते, कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगरचे माजी संचालक संदीप कर्डिले आणि विद्यमान संचालक दत्ताभाऊ तापकिरे, रावसाहेब कर्डिले, सरपंच, बुऱ्हाणनगर तसेच स्वीकृत संचालक मच्छिंद्र तावरे, संस्थेचे सभासद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles