Thursday, March 12, 2026

प्रशासकीय तयारी पूर्ण ……राहुरी पोटनिवडणुक मोठी अपडेट

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने निवडणूक विभागाने प्रशासकीय तयारी पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. चालू आठवड्यात राहुरी विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले.

भाजपचे दिवंगत आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी यापूर्वीच अंतिम मतदार यादीची घोषणा करण्यात आलेली आहे. या ठिकाणी 3 लाख 33 हजार 307 मतदारांची नोंदणी झालेली असून यात 1 लाख 72 हजार 173 पुरुष तर 1 लाख 61 हजार 133 महिला मतदार यांचा समावेश आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होईपर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, राहुरी प्रमाणे बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. या ठिकाणी देखील प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात येत आहे. यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतानूसार एखाद्या राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबत देशातील सर्व विधानसभेच्या पोट निवडणूका उकरण्यात येत असतात. त्यानूसार लवकरच बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होणार असून त्याच वेळी महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामतीची विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

राहुरीच्या पोट निवडणुकीसाठी मतदार यंत्रांची प्रथम तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे. यात 598 बीयू, 614 सीयू आणि 606 व्हीव्ही पॅट यांची तपासणी करून मतदान यंत्रे निवडणुकीसाठी सज्ज ठेवण्यात आलेले आहेत. लवकर या मतदार यंत्राचे एकत्रिकरण करून त्यातील कोणते यंत्रे राखीव ठेवणार आणि कोणते कोणत्या मतदान केंद्रावर पाठवण्यात येणार याचे यांत्रिक पध्दतीने निश्चित करण्यात येणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles