Tuesday, March 10, 2026

राहुरी पोटनिवडणुकीसाठी मुंबईत बैठकींना वेग ;अक्षय कर्डिले विधिमंडळात….

राहुरी पोटनिवडणुकीसाठी मुंबईत बैठकींना वेग आला आहे. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनाची गडबडीत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांनी भेट घेतली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत अक्षय कर्डिले यांच्याबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप हे देखील उपस्थित होते. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे मेहुणे अक्षय कर्डिले हे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर स्पाॅट झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांबरोबर महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघाची देखील पोट निवडणुकीची तयारी सुरू आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. राहुरी मतदारसंघातून नेमकं कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे.

शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांचे नाव चर्चेत आहे. पण त्यांच्या उमेदवारीवर नक्की शिक्कामोर्तब होणार का? याची उत्सुकता आहे. यातच आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अक्षय कर्डिले यांनी भेट घेतली. या बैठकीवेळी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.

या बैठकीत नेमकं काय ठरलं, हे काही अजून पुढं आलं नाही. परंतु अक्षय कर्डिले मतदारसंघात अ‍ॅक्टिव्ह झाले आहे. अक्षय कर्डिले यांचे प्रतिस्पर्धी कोण हा देखील विषय चर्चेचा आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे देखील मतदारसंघात सक्रिय आहेत. परंतु ते नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याची उत्सुकता आहे.

प्राजक्त तनपुरे यांच्या गळ्यात भगवा पंचा आणि डोक्यावर भगवी टोपी दिसते आहे. याशिवाय ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. तनपुरे मतदारसंघात सक्रिय असून, ते हिंदुत्वाचे विचार बोलून दाखवत असल्याने ते भाजपकडून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles