सोशल मीडियावर कायम अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुलांचे डान्स तर कधी मोठ्या मुलांचे डान्स. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. डान्सचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये कधी कोणी आपली डान्स कला दाखवत असते, तर कधी प्रोफेशनल डान्सर्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात. लग्नाच्या वरातीतल देखील डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.
या महिलांनी जुनं मराठी गाणं “तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी” या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हल्ली मराठी गाण्यांवर फारसं कुणी डान्स करताना दिसत नाही, मात्र या महिलांनी मराठी गाण्यावर असा डान्स केला आहे की, पाहून तुम्हीही थिरकायला लागाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ६ महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. एवढचं नाहीतर या महिलांनी स्टेप अशा केल्या आहेत की, जणू काही त्या प्रोफेशनल डान्सरच आहेत. संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत.
व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान अशाच काही हौशी महिलांचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साडी नेसून या महिलांनी चाळीतल्या छोट्याशा जागेत भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ vaishali__m__surve नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.


