Thursday, March 12, 2026

अधिवेशन सुरू असतानाच मुंबईतील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी;सभापती राम शिंदे म्हणाले…..

मुंबईतील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाली असल्याची माहिती मिळत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी प्राप्त झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ विधानभवनाच्या इमारतीचा ताबा घेत तपासणी केली. बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाद्वारे इमारतीची पाहणी केली. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच विधानभवनासह आणखी चार महत्त्वाच्या ठिकाणांसाठीही धमकी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सुरक्षा दल पाहणी करत असताना इमारतीमधील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना बाहेर काढण्यात आले होते, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सदर धमकी खोटी असल्याची माहिती दिली गेल्याचे सांगितले.
राम शिंदे काय म्हणाले?
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी याबद्दल माध्यमांशी संवाद साधत संपूर्ण माहिती दिली. “आज सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी मुंबई आयुक्तांच्या ईमेलवर धमकी प्राप्त झाली होती. विधानभवन बॉम्ब किंवा क्षेपणास्त्राने उडवून देण्याचा त्यात उल्लेख होता. धमकी मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून विधानभवन इमारतीची सखोल तपासणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने आवश्यक ती दखल घेतली आहे”, अशी माहिती रादरम्यान ही धमकी कुणी दिली, याची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही, असेही राम शिंदे म्हणाले. संवेदनशील ठिकाणांबाबत सदर धमकी मिळाली असल्यामुळे पूर्ण तपासानंतरच त्याची माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले.
कामकाज सुरू राहणार
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे आज सकाळपासूनच दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू होणार होते. त्याची तयारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केली आहे. बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केल्यानंतर आम्ही विधानभवनात प्रवेश केला असून लवकरच कामकाज सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles